नागपूर (वृत्तसंस्था) पुढील १५ ते २० दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊन निर्णयाचे उल्लंघन करू नये. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहणार असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. परंतू लॉक डाऊनचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
जनता कर्फ्यूला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे आगामी काळातही राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांना जनतेने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तर, शासनाने घोषित केलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. कोरोना विषाणू हळूहळू पावले पुढे टाकत असून आपण त्याला थोपवत आहोत. मात्र यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून अनावश्यक नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. पुढील १५ ते २० दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये किंवा अफवा पसरवू नये. प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत, त्यांना सहकार्य करावे. लॉकडाऊन निर्णयाचे उल्लंघन करू नये. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहणार असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.