पारोळा, प्रतिनिधी । निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या संस्थे अंतर्गत हे विविध बचत गट चालवले जातात. तालुक्यातील बहादरपूर येथे बचत गटाच्या माध्यमातून ७०० ते ८०० महिलांना घरातच रोजगार मिळत असतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नयेसाठी देशात लॉक डाऊन जाहीर झाल्याने यामहीलांच्या रोजगारावर गदा आल्याने संस्थेने यामहीलांना महिनाभराचा तर आदिवासी कुटुंबांना १५ दिवसाचा मोफत किराणा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
बहादरपूर येथील सातशे ते आठशे महिला या रोज गोधडी व गारमेंटचे लेडीज कपडे बनवण्याचे काम करतात. त्या माध्यमातून या महिलांना रोजच गावात ,घरातच बसून हक्काचा रोजगार उपलब्ध होतो. परंतु, सध्याच्या लॉकडाऊन मुळे रोज ३०-४० हजार रुपयांची उलाढाल होणारा हा रोजगार बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या महिलांवर सध्या बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. महिलांना स्वतः स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने गावातीलच रॅमण मॅगसेस पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा यांनी बचत गटाचे एक मोठे जाळे हे बादरपुरसह परिसरात निर्माण केले आहे. गोधडी बनवताना येणाऱ्या अडचणीतुन गावातील महिला या लेडीज गारमेंट कडे वळल्या आहेत. महिलांसाठी लागणारे पैजामा, कुर्ता, टॉप, बनवण्याकडे या महिला अधिक गुंतल्या व आकर्षीत झाल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून विविध ठिकाणचे ऑर्डर्स घेऊन त्यांना पोच करून देण्याचा उपक्रम हा गेल्या दोन वर्षापासून बाहदरपुर गावातून सुरू आहे. लॉक डाऊनमुळे या गारमेंटमधील कपड्यांना देखील ब्रेक लागल्यामुळे ते तयार करणे बंद ठेवावे लागले आहे. परिणामी या महिला घरीच बसल्या आहेत. निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या संस्थे अंतर्गत हे विविध बचत गट चालवले जातात. लॉकडाऊनमुळे या महिलांवर बेकारीची कुऱ्हाड पाहून संस्थेने या सर्व महिलांना एक महिनेचा किराणा हा उपलब्ध करून दिला आहे. तसेच गावातील गोरगरीब आदिवासी कुटुंबाना या संस्थेतर्फे पंधरा दिवसाचा किराणा मोफत उपलब्ध करून दिला आहे.