भुसावळ प्रतिनिधी । सर्वत्र लॉकडाऊन सुरू असतांना सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता पार्टी करणार्या येथील नगरसेवकासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने प्रत्येकाला सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे लागत आहेत. तसेच या कालावधीत सार्वजनीक ठिकाणी वावरतांना अनेक नियम आखून दिले आहेत. या पार्श्वभूमिवर, जुना सातारा परिसरात असणार्या मरिमाता मंदिराच्या मागे ताडीच्या मळ्याजवळ मोकळ्या जागेत पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. डीवायएसपी गजानन राठोड, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी यानुसार पथक पाठविले. तेव्हा त्यांना या कर्मचार्यांना नगरसेवक मुकेश पाटील, तुषार प्रकाश राणे, बापू मोतीराम महाजन, सतीश ईश्वर सपकाळे, सुनील लिलाधर बर्हाटे, कृपाल भूषण चौधरी आणि भूषण मुरलीधर वराडे हे सात जण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असतानाही सोशल डिस्टन्सिंग न पाळता जेवण करत असल्याचे दिसले. यामुळे, या सर्वांवर शहर पोलिस ठाण्यात कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००