जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे जिल्ह्यात संचारबंदी असतांना अनावश्यक रित्या दुकाने फिरणाऱ्या ४ जणांवर जिल्हा पेठ पोलीसांनी कारवाई केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक गोष्टींसाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र याचा गैरफायदा घेत विनाकारण फिरणाऱ्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सिध्दार्थ सुरेश बोरोले (वय-३२) रा. खंडेराव नगर, सतिश मोहन चौधरी आशाबाबा नगर, अब्दुल रज्जाक शफि उल्ला (वय-२८) मास्टर कॉलनी जळगाव, अमित राजकुमार वधवाणी (वय-२०) रा. गायत्री नगर, जळगाव यांच्यावर संचारबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.