आग्रा (वृत्तसंस्था) मोदींनी माझ्यासाठी सर्व रस्ते बंद केले आहेत. दुसरीकडे कुठेच जाण्याचा पर्याय माझ्याकडे नाही. मी कुठे जाऊ ? माझ्या मालकालाही माझ्यावर दया येत नाही, अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहून एका हॉटेलात नौकरी करणाऱ्या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लॉकडाऊन नंतर या तरुणाची नौकरी गेली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्याने आपल्या मालकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर आपल्या मालकाने मदत करण्यास सरळ नकार दिला. आपण शिलाँगमध्ये चोरी करायचो. पण चांगले आयुष्य जगण्याच्या हेतूने शहर सोडले होते असेही तरुणाने सांगितले आहे. फेसबुक पोस्ट मयत तरुणाने लिहिलेय की, मी आग्रा येथील सिकंदरा कारगील शांती फूड कोर्ट रेस्तराँमध्ये काम करतो. मोदींनी माझ्यासाठी सर्व रस्ते बंद केले आहेत. दुसरीकडे कुठेच जाण्याचा पर्याय माझ्याकडे नाही. मी कुठे जाऊ ? माझ्या मालकालाही माझ्यावर दया येत नाही. मालकीण सीमा चौधरी यांनी मला जिथं हवं असेल तिथे निघून जा असे सांगितले आहे. मला फक्त एकच मार्ग दिसत आहे तो म्हणजे आत्महत्या. माणुसकी शिल्लक असेल तर माझा मृतदेह माझ्या घऱी पोहोचवा जेणेकरुन मला शांती लाभेल,असेही तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.