मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
रुग्णांची वाढती संख्या आणि परिस्थिती बिघडता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केला जाणार असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना गरज लागली तर पुन्हा लॉकडाउन करावा लागेल असे सांगितले होते. पण या वक्तव्याचा काही ठिकाणी विपर्यास करत राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर होणार असल्याची अफवा पसरवली होती.