धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र शासनाने लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून शहरात दुचाकी वाहनांवर निर्बंध लावण्यात आले आहे.
संचारबंदीच्या कालावधीत नागरीकांना संचारबंधी करण्यास मनाई असतांना शहरात जिवनाश्यक वस्तू न घेतला काही तरूण वाहनांवर संचार करत असतांना आढळून आले. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रशासनाने आजपासून शहरात दुचाकी वाहनांना निर्बंध लावण्यात आले आहे. खरेदीच्या नावाखाली शहरात विनाकारक अनावश्यक फिरतांना नागरीक दिसून आल्यावर त्यांच्या कारवाई करण्यात येणार असून वाहन देखील जप्त करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनातर्फे सदरचे वाहन जप्त करून वाहनावरील सर्व व्यक्तींवर गुन्हे दाखल करून सक्त कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.