जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव, अमळनेर आणि भुसावळ या शहरात ७ ते १३ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. आज लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहरात काही ठिकाणी रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिसून आली.
लॉकडाऊनच्या प्रथम दिवशी दुचाकी, चारचाकी आणि नाहक फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. दुपारच्या वेळेस तर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, डीवायएसपी डॉ.निलाभ रोहन हे स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करत होते.
दरम्यान आज दुसऱ्या दिवशी मात्र लॉकडाऊनच्या काळात बरेच दुचाकी व चारचाकी वाहन रस्त्यावरून फिरताना दिसून आल्याचे दृश्य होते. शिवाय पोलीस बंदोबस्त सुद्धा कमी दिसून आला. डबल सीट वाहन धारकांवर फारशी कारवाई व दंड वसूल करण्यात आला नाही. नियमांचे पालन न करणाऱ्या काहींनी व रिकामटेकड्यांनी बिनदिक्कतपणे वाहने चालवून पोलिसांना चुकवित शहरातून फेरफटकाही मारला. पोलिसांची ढिलाई दिसून आली. सर्वत्र नाकाबंदी सुरू आहे. आज काहीशी वर्दळ दिसून येत आहे. लॉकडाऊनला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद द्यावा आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासन चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहे असाही सूर नागरिकांचा आहे. लॉकडाऊन चे उल्लंघन करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी दुपारी शहरातील गांधी मार्केटमध्ये नागरीकांची वर्दळ दिसून आली, भीलपूरा चौकात पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता, तर रथचौकात पुर्णपणे शांतता दिसून आली, नेरी नाका परिसर हा महत्वाचा भाग असल्याने पांझरपोळी परिसरात काही प्रमाणावर शांतात होती, अजिंठा चौफुलीवर राष्ट्रीय महामार्गावर देखील बऱ्यापैकी गर्दी कमी होती मात्र काही विनाकारण फिरणाऱ्यांवर चांगलीच कारवाई केली होती.
https://www.facebook.com/watch/?v=280993546477073