यावल अय्युब पटेल । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना राबवित आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना नियमानूसार दहा टक्के कर्मचारी कामावर हजर राहण्याच्या सुचना असतांना यावल येथील तहसील कार्यालयात ठरविक अधिकारी वगळता इतर सर्व गेल्या महिन्याभरापासून कार्यालयात फिरकलेच नाही.
शेंदुर्णीत लॉकडाऊनची ऐसीतैशी; प्रत्येक बुधवारी भरतोय आठवडे बाजार
कोरोना विषाणूच्या आजाराचे प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले असून यासाठी प्रशासनाने शासकीय सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचारीसाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही कर्मचाऱ्यांमध्ये फिरत्या पद्धतीने आपली शासकीय सेवा बजवावी यावी याकरिता आधी ५ टक्के कर्मचारी नव्याने लागू झालेल्या नियमानुसार १० टक्के कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासाठी आपल्याकडे बजवावे असे आदेश असतानाही मात्र यावलच्या तहसील कार्यालयात लॉकडाऊनच्या प्रसंगी संधीचा फायदा घेत यावलच्या तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, नायब तहसीलदार एम. एम. तडवी, पुरवठा विभागाचे सखावत तडवी, राजेंद्र भंगाळे, शेखर तडवी, आर. बी. माळी, डी.एस. बाविस्कर, सुयोग पाटील, संतोष पाटील वगळता इतर कुठलाही अधिकारी कार्यालयीन कामकाजात मागील एक महिन्यापासून दांडी मारून गैरहजर राहताना दिसत आहे.
धरणगावात चिमुकलीसह दानशुर व्यक्तींकडून कोरोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत (व्हिडीओ)
या प्रशासकीय कामकाजाचा अतिरिक्त बोजा या अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर येऊन बसला असून वाढलेल्या कामाचा मानसिक ताण त्यांना होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या या संकटसमयी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या कुटुंबातील याच काळात सासरे यांचे नुकतेच निधन झाले असतांनादेखील त्यांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवून आपल्या मुख्यालयातच राहुल आपले कर्तव्य बजावत आहे. दरम्यान कोरोना लॉकडाऊनच्या संधीचा गैरफायदा घेत दांडी मारणाऱ्या तहसीलदार यांच्या निस्वार्थ सेवा कार्याचे अनुकरण करावे असे आज तरी बोलावे लागेल.