धरणगाव प्रतिनिधी । शहरातील शहर शिवसेना, नगरपालिका मुख्याधिकारी व चिमुकलीकडून कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करून एक आदर्श निर्माण केला आहे.
तालुक्यातील कल्याणे-होळ येथील डॉ.आर.आर.पाटील यांची नात तथा शहरातील आराधना हॉस्पिटलचे डॉ.धीरज आर. पाटील यांची मुलगी आराधना पाटील या चिमुकलीने आपल्या खाऊसाठी जमवलेले पैसे खर्च न करता कोविळ -19 ला पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ११ हजार रूपयाची मदत केली. तिने नुकताच पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे सुपूर्द करून कौतुकास्पद कार्य करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक आदर्श निर्माण केला.
तर धरणगाव शहर शिवसेनेच्या वतीने २ लाख, दिनेश लोहार यांचे वडिलांचे उत्तर कार्याचा खर्च न करता साहाय्य निधी ११ हजार, धरणगाव नगरपालिका मुख्यधिकारी ५ हजाराचा धनादेश आज तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याकडे सुपुर्त केला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, राजेंद्र महाजन, भानुदास विसावे, विनोद रोकडे यांच्याही आधी कार्यकर्ते उपस्थित होते.