लॉकडाऊन काळात मालमत्ताकर भरणा ऑनलाईन पद्धतीने

जळगाव, प्रतिनिधी । महापालिका हद्दीतील मिळकतधारकांना चालू आर्थिक वर्षाचा भरणा रोखीने करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन असल्याने या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जळगाव महापालिका हद्दीत अत्यावश्यक सेवा वगळता ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केले आहे. या कालावधीत मालमत्ताकराचा भरणा १० टक्के सुटसह ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. या कालावधीत रोख व धनादेशाद्वारे भरणा बंद राहणार असून मिळकतधारकांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपयुक्त संतोष वाहुळे यांनी केले आहे.

Protected Content