पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या आरक्षण धोरणामूळे ओबीसी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान : आंबेडकर

 

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या आरक्षण धोरणामूळे २०१७ पासून ओबीसीचे अकरा हजार विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित वंचित असल्याचा आरोप बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. या मुद्द्यावर लवकरच राज्यभरात मोठे आंदोलन उभारू, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे.

 

अकोला येथील एका पत्रकार परिषदेत बोलतांना आंबेडकर म्हणाले की, भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, नीटमार्फत होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींचे आवश्यक आरक्षण २०१७ पासून कमी केले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील सर्वसामान्य विद्याार्थी वंचित राहिले आहेत. या मुद्द्यावर आंदोलनासाठी कोरोनाच्या नियमानांही झुगारून लावणार असल्याचा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.

Protected Content