नवी मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊनचे उल्लंघन करून मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिराला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अजय बहिरांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी होत आहे.
बहिरा हे आपल्या दहा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना बहिरा यांनी हा प्रकार केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात पार्टी आयोजित केली जाण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे भाजप अडचणीत सापडली आहे.