जळगाव प्रतिनिधी । एकीकडे लॉकडाऊनमुळे रोजगारावरावर कुर्हाड कोसळली असतांना ऑनलाईन ग्रोसरी डिलीव्हरीच्या कंपनीतर्फे शहरातील तरूणांना स्वयंरोजगारासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे.
सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापार आणि अन्य उद्योग बंद असल्यामुळे अनेक युवक बेरोजगार झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीत अनेक युवकांना स्वयंरोजगार देण्यासाठी लाईव्ह मीडिया व्हेन्चर पुढे सरसावले आहे. सध्या सुरु असलेला कोरोनाचा प्रकोप त्यामुळे जीवनावश्यक वस्तू सुध्दा आणण्यासाठी घरातून बाहेर निघण्याची भिती वाटते. नेमकी हिक परिस्थिती लक्षात आल्याने लवकरच जळगाव शहरात ऑनलाईन किराणा स्टोअर ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू करण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे ग्राहकांना घरपोच किराणा माल, डेअरी प्रॉडक्ट आणि धान्य तर मिळणारच आहे. पण, याच्या माध्यमातून जळगाव शहरात नवीन स्वयंरोजगार निर्माण होत आहे या साठी जळगाव शहरातील विविध किराणा स्टोअर्स मधून ऑर्डर चा माल ताब्यात घेवून ग्राहकांना घरपोच करून देण्यासाठी, स्वत:चे स्मार्ट फोन आणि टु-व्हीलर असणार्या हुशार, प्रामाणिक व मेहनती २५ युवकांना आकर्षित स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे.
ज्या युवकांना या संधीचा लाभ घेवून दोन फायदे मिळवायचे आहेत म्हणजेच नागरिकांच्या सेवे सोबतच दुकानांत गर्दी कमी होण्याची शक्यता असल्यामुळे कोरोनाचे संक्रमण कमी होण्यास मदत होईल.
जळगावातील इच्छुक होतकरू युवकांनी आपला अर्ज एचआर मॅनेजर राजेंद्र सूर्यवंशी यांना मोबाईल क्रमांक ८३९००३३७७० वर व्हाटसअॅपच्या माध्यमातून पाठविण्याचे आवाहन लाईव्ह मीडिया व्हेन्चरतर्फे करण्यात आले आहे.