रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात विना मास्क वा रुमाल बांधलेल्या चार जणांवर तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
कोरोना सारख्या जिवघेण्या व्याधी विरुध्द लढण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. आज तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे यांनी लॉकडाउनचे पालन करण्याच्या वारंवार सूचना करून देखिल ग्रामीण भागात सूचनेचे पालन करत नसल्याने आज विना मास्क तसेच रुमाल न बांधलेल्या विरुध्द कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये रूपेश महाजन (आहिरवाडी); हेमंत पाटील (खानापुर); किशोर महाजन (चोरवड) व मोहीत कुंभार (कर्जोत ) यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.