जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन असतांना पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीचालक, पेट्रोलपंपचालकासह एकावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आजपासून ७ जुलैपासून पुढील सात दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. असे असतांना आज सकाळी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास शहरातील पलोड पेट्रोलपंपावर दुचाकीचालक शेख अजगर शेख चांद (वय-४०) रा. शाहूनगर हे दुचाकी क्रमांक (एमएच १९ आर २५८३) मध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले. त्यावेळी पेट्रोलपंपावर पंप कर्मचारी खलील शेख गनी पिंजारी (वय-४०) रा. खंडेराव नगर, टिपू सुलतान चौक जळगाव याने पेट्रोल भरत असल्याचे जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पलोड पेट्रोल पंप मॅनेजर अशोक हनुमंत पाटील (वय-५१) रा. नंदनवन नगर जळगाव यांच्यासह पेट्रोल पंप कर्मचारी आणि दुचाकीधारक यांच्यावर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.