लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन

 

चोपडा प्रतिनिधी । शेतकरी, शेतमजूर, वयोवृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग यांचे चार महिन्यांचे थकीत मानधन फारकासह दिवाळीपूर्वी अदा करा आदी मागण्यांचे निवेदन चोपडा तालुका तहसीलदार छगन वाघ यांना लालबावटा शेतमजूर युनियन तर्फे देण्यात आले.

शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या दिवाळीला तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला अमृतराव महाजन शांताराम पाटील यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शशिकला निंबाळकर, सरला देशमुख, रेखाबाई साळुंखे, नजमा बी शेख गफार, सुमनबाई माळी, नंदाबाई चौधरी, इंदुबाई चौधरी, लक्ष माळी, उषा भराडी, मीराबाई पारधे, वत्सला चौधरी, मीना साळुंखे, शीला बाविस्कर आदी उपस्थित होते.

Protected Content