पश्चिम बंगालमध्ये लोकल सेवा होणार सुरळीत तर मुंबईकरांना प्रतीक्षा

मुंबई, वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमध्ये ११ नोव्हेंबरपासून उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली असून दुसरीकडे मुंबईकर
आद्यपही लोकल सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करत पश्चिम बंगालमध्ये ११ नोव्हेंबरपासून उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकल सेवा बंद होती. ११ नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमधील उपनगरीय सेवा पुन्हा रुळावर येणार आहे. कोरोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईल याची काळजी घेतली जाईल, असं पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार आणि ईस्टर्न रेल्वेमध्ये मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतरच लोकल सेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. साऊथ ईस्टर्न रेल्वेला लोकल सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई उपनगरी रेल्वेबाबत वेळकाढू धोरण
सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे (लोकल) प्रवासाची प्रतीक्षा असतानाच यावरून राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे ठोस निर्णयाऐवजी दोन्ही प्रशासनांकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचे चित्र सध्या आहे. रेल्वेकडून त्रुटी काढण्याचे काम केले जात असल्याचा आरोप नुकताच मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता. वडेट्टीवारांच्या या आरोपाला मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे उत्तर देत २८ ऑक्टोबरला राज्य सरकारला पत्राद्वारे उत्तर देऊनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Protected Content