याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अथर्व कॉलनी येथे राजेंद्र मुरलीधर लवणे (वय-५३) हे वास्तव्यास आहेत. १५ मे रोजी कामानिमित्ताने राजेंद्र लवणे हे लाडवंजारी हॉल परिसरात आले होते. यादरम्यान त्यांनी त्यांची (एमएच १९ सीटी १०२८) या क्रमांकाची दुचाकी लाडवंजारी हॉल समोर उभी केली होती. काम आटोपून परतल्यानंतर हॉल समोर उभी केलेली दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने राजेंद्र लवणे यांनी दोन दिवसानंतर मंगळवार १७ मे रोजी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहेत.
लाडवंजारी हॉल परिसरातून एकाची दुचाकी लांबविली
3 years ago
No Comments