लष्करी कवायतीसाठी रशियाचे जवान पाकिस्तानात

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । पाकिस्तानी सैन्यासोबत संयुक्त लष्करी कवायती करण्यासाठी रशियाच्या स्पशेल फोर्सेस गुरुवारी विशेष विमानाने पाकिस्तानात दाखल झाल्या.

रशिया भारताचा विश्वासू मित्र आहे. पण आता रशिया पाकिस्तानच्या जवळ जात आहे. दोघांमध्ये मैत्री संबंध विकसित होत आहेत.DRUZHBA असे या लष्करी कवायतीचे नाव असून दोन आठवडे हा युद्ध सराव चालणार आहे.

पाकिस्तानी लष्कराकडून ही माहिती देण्यात आली आहे. “दोन्ही सैन्य दलांमध्ये दहशतवाद विरोधी कारवाईचा अनुभव शेअर करणे, हा या संयुक्त कवायतीमागे उद्देश आहे. स्काय डायव्हींग आणि ओलीस ठेवलेल्यांची सुटका कशी करायची, याचा अभ्यास या कवायतींमध्ये करण्यात येईल” असे पाकिस्तानी लष्कराच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तान आणि रशिया २०१६ पासून हा लष्करी अभ्यास करत आहे. यंदाचे पाचवे वर्ष आहे. पाकिस्तानचे अमेरिकेसोबत असलेले संबंध बिघडल्यापासून पाकिस्तान रशिया आणि चीनच्या जास्त जवळ गेला आहे. पाकिस्तान रशियासोबत संरक्षण संबंध विकसित करण्यासाठी जास्त उत्सुक आहे.

Protected Content