लखनऊ वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशात संमत करण्यात आलेल्या लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशातील योगी सरकारने लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराविरोधी आणलेल्या अध्यादेशावरून वाद सुरू झाल्याचे दिसून येत आहे. याबाबतच्या वटहुकमास राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या समाज वादीपार्टीने यास विरोध केला आहे. त्या पाठोपाठ आता बसपा अध्यक्षा मायावती यांनी देखील योगी सरकारला या निर्णयाबद्दल पुनर्विचार करावा असे म्हटले आहे.
आज या संदर्भात बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लव्ह जिहादफबद्दल उत्तर प्रदेश सरकारद्वारे आणला गेलेला धर्मांतराविरोधी वटहुकूमाबद्दल अनेक शंका आहेत. खरतर देशात जबरदस्ती व कपटाने धर्मांतरणास विशेष मान्यताही नाही व स्वीकृती नाही. या संबंधी अनेक प्रभावी कायदे अगोदरपासून आहेत. सरकारने यावर पुर्नविचार करावा ही बसपाची मागणी आहे.