वाराणसी वृत्तसंस्था । देशातील नागरिकांसाठी लवकरच ई-पासपोर्ट प्रदान करण्यात येतील अशी घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे सरकार लवकरच चिप असलेले ई-पासपोर्ट जारी करणार असल्याची घोषणा केली. नाशिकमध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस येथे हे पासपोर्ट बनवले जातील. यासाठी आयआयटी कानपूर आणि एनआयसीने एकत्र येत एक सॉफ्टवेअर बनवलं आहे.
नवीन ई-पासपोर्टवर अर्जदाराची डिजीटल स्वाक्षरी असेल आणि ते चिपमध्ये सेव्ह केलं जाईल. जर कोणी व्यक्ती चिपसोबत कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं पासपोर्ट निष्क्रीय होईल. याशिवाय चिपमध्ये सेव्ह केलेली माहिती फिजीकल पासपोर्टशिवाय वाचता येणार नाही.