लम्पी आजारामुळे दगावलेल्या गुरांची नुकसान भरपाई जाहीर 

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील माजी नगरसेवक तथा युवा समाजसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी लंम्पी आजाराच्या काळात शेतकरी व पशुपालन करणाऱ्यांचे झालेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाई मिळावी याकरीता पाठपुरावा केल्याने अखेर राज्य शासनाच्या वतीने लंम्पी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

लंम्पी आजाराने मरण पावलेल्या गुरांच्या विम्या संर्दभात प्रश्न पशुसंवर्धन विभागा विचाराधीन असल्याचे राज्य शासनाचे पत्र प्राप्त झाले असुन डॉ.कुंदन फेगडे यांच्या मागणीला पशुसंवर्धन विभागाचे सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

लंम्पी संर्दभात पशुसंवर्धन विभागाच्या मंत्र्याकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच लंम्पी आजाराने मरण पावलेल्या गुरांचा विमा करण्यात यावा या साठीची मागणी महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्रे देवुन डॉ.कुंदन फेगडे यांनी केली होती, सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केल्याने त्यांच्या या मागणीला यश मिळाले असुन पशुसंवर्धन विभागाकडून सकारात्मक उत्तर मिळाले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपत्ती निवारण धोरणानुसार मदत जाहिर झाली असुन विम्या संर्दभात पशुसंवर्धन विभाग विचाराधीन असल्याची पशुसंवर्धन उपायुक्तांना पत्रान्वये कळवले आहे.

लंपी स्किन डिसीज आजारामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले होते त्यांना आर्थिक मदत मिळण्यास आणि गु्रांसाठी शासकीय विमा योजना राबविण्या बाबत डॉ. कुंदन फेगडे यांनी केलेल्या मागणी ला यश मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यात व महाराष्ट्रात मागील नऊ दहा महिन्यापासून ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या गुरांवर लंपी स्किन डिसिज या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत होता हा आजार अतिशय जलद गतीने पसरत होता या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या नऊ ते दहा महिन्यात जळगाव जिल्ह्यात व महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या गुरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात काही गुरे दगावली गेली असुन. या संपूर्ण झालेल्या नुकसानाची चिंता हि पशुधन पालकांना व शेतकऱ्यांना भेडसावत असून यासाठी शासनातर्फे तात्काळ उपाय योजना करून आर्थिक मदत मिळावी तसेच गुरांसाठी शासकीय विमा योजना तयार करून राबविण्यात यावी अशी मागणी डॉ. कुंदन फेगडे यांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांना निवेदन देऊन केली होती.

या मागणीला यश मिळाले असून जळगाव जिल्ह्यात एकूण ५,७७,३०२ गोवर्गीय पशुधना साठी विविध योजनांमधून ६,४२,६०० गोट पाक्स लसमात्राचा पुरवठा करण्यात आला असून त्यापैकी ५,७७,३०२ (१००%) पशुधनास प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे.त्याच प्रमाणे शासन निर्णय दिनांक १६-०९-२०२२ नुसार मृत पशुधनच्या पशुपालकांस राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणानुसार नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर सुरु करण्यात आली असून जळगाव जिल्हातील दिनांक ३१-१०-२०२२ अखेर ४९९ मृत पशुधनच्या पालकांस रु १२५.२६ लक्ष नुकसान भरपाई देण्यात आलेली असून उर्वरित मृत पशुधनच्या पशुपालकांस नुकसान भरपाई देण्यात येत आहे असे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त देवेंद्र जाधव यांनी पत्रान्वये कळवले आहे.

विम्या संर्दभात विचाराधीन

लंपी च्या संर्दभात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्या करीता त्यांच्या गुरांसाठी शासकीय विमा योजना तयार करून राबविण्यात यावी अशी मागणी केली आहे तेव्हा चर्चे अंती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त देवेंद्र जाधव यांनी विम्या संर्दभात पशुसंवर्धन विभाग विचाराधीन असल्याचे सांगीतले.

Protected Content