हैद्राबाद (वृत्तसंस्था) लग्नाच्या मिरवणुकीत नाचतांना नवरदेवाचा हृदय विकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तेलंगणामधील निजामाबाद येथे घडली. गणेश असे २५ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे.
निजामाबादमधील बोधन शहरात १५ फेब्रुवारी गणेशचा विवाहसोहळा होता. लग्नाची वरात निघाल्यावर गणेश आणि त्याच्या पत्नीने वरातीमध्ये जोरदार नृत्यू केले. आनंदाच्या भरात गणेश त्याच्या मित्र परिवारासोबत बराच नाचत होता. नाचताना अचानक गणेशला हृदय विकाराचा झटका आला. यावेळी कुटुंबियांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हृदय विकाराच्या झटक्याने गणेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, घटनेमुळे बोधन शहरात शोककळा पसरली आहे.