Home क्राईम लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार; पोलिसात गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार; पोलिसात गुन्हा

2rapecase 56 1

जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी नेवून २४ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी संशयित आरोपीस अटक करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मी तुझ्याशी लग्न करेल असे सांगून २४ वर्षीय तरूणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेवून अत्याचार करणारा संशयित आरोपी ज्ञानेश्वर अशोक सपकाळे रा. सावखेडा बु ता.जि.जळगाव याच्या विरोधात पीडित तरूणीच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून तालुका पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरूणीने फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी सपकाळे यांने मला लग्नाचे आमिष दाखवत जानेवरी २०२० ते मार्च २०२० दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान काल सोमवारी १८ मे रोजी दुपारी १२ वाजता मला पुन्हा फुस लावून नेत तापी नदीत अत्याचार केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सपोनि श्री. चव्हाण करीत आहेत.


Protected Content

Play sound