जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात तील एका भागात २५ वर्षीय तरुणीही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे सध्या ती शिक्षण घेत आहे दरम्यान डिसेंबर २०२२ ते अद्यापपर्यंत एजाज इंद्रिस खाटीक याने तरुणीला घरात एकटी असताना लग्नाचे आमिष दाखवत तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर जबरी अत्याचार केला.
दरम्यान ही घटना पीडित तरुणीने घरच्यांना सांगितले नाही, परंतु अखेर मन घट्ट करत तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर शुक्रवार २ जून रोजी रात्री १० वाजता पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी एजाज इंद्रिस खाटीक याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.