लंगडाआंबा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील लंगडाआंबा येथील एका १३ वर्षीय  मुलीचा वनरक्षकाने विनयभंग केल्याचा आरोप पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी केला  याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

विनयभंग झालेल्या अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिली असुन , पोलीस यंत्रणेकडुन तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात आला सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम ठीकाणी लंगडाआंबा या आदीवासी वस्तीवर १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी १३ जुलैरोजी लहान भावंडाबरोबर घरात असतांना वनरक्षक कर्मचाऱ्यांने घरात घुसुन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली

याबाबत १४ जुलैच्या रात्री उशीरा पिडीत मुलीच्या आईची तक्रार घेण्यात आली चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीत  बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार लगडाआंबा पाड्यावरील घरी मंगळवारी वनरक्षक आरोपी रमेश बाबुता थोरात  सकाळी आला  त्यावेळी पिडीत मुलीचे आई व  वडील खरगोनला ( मध्य प्रदेश ) गेले होते वनरक्षक थोरात घरात पाणी पिण्याच्या उद्देशाने आला ६ वर्षीय बहिणीने पाणी आणले असता तु २० रूपये घे व हातपंपवरून ताजे पाणी आण असे सांगीतले दुसऱ्या बहिणला २० रूपये दिले व  बिस्कीट आण असे सांगत बाहेर पाठवले त्यानंतर पीडित बालिकेचा  विनयभंग केला हा प्रकार पिडीत मुलीने सायंकाळी आई, वडीलांना सांगीतल्यावरून बुधवारी मुलीच्या आई वडीलांनी व  नांतेवाईकांनी यावल पोलीस स्टेशन गाठले

वनविभागाकडून मात्र असा प्रकार झाला नसल्याचे सांगुन घडलेल्या घटनेचा इन्कार केला जात आहे आठ तास खलबत केल्यानंतर रात्री ११ वाजेला पिडीताच्या आईचा अर्ज घेवुन चौकशीअंती यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलिस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत  .

 

Protected Content