रोलर म्युझिकल चेअर अँड स्पीड स्केटिंगमध्ये पाचोरा येथील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत निवड

पाचोरा, प्रतिनिधी | आत्म मलिक क्रीडा संकुल, शिर्डी येथे १५ वी राज्यस्तरीय रोलर म्युझिकल चेअर व स्पीड स्केटिंग स्पर्धा नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धांमध्ये पाचोरा येथील मुलांनी मेडल प्राप्त केले आहेत.

 

१५ व्या राज्यस्तरीय रोलर म्युझिकल चेअर व स्पीड स्केटिंग स्पर्धेत स्पीड स्केटिंगमध्ये नील सोनवणे (गोल्ड मेडल), भार्गव बडगुजर (सिल्वर मेडल), आयुष मोरे (ब्राँझ मेडल), यश पाटील (ब्राँझ मेडल) पटकवले आहे. तसेच म्युझिकल चेयर स्केटिंगमध्ये भार्गव बडगुजर (सिल्वर मेडल), नील सोनवणे (ब्राँझ मेडल), आयुष मोरे (ब्राँझ मेडल), यश पाटील (ब्राँझ मेडल) ची कमाई केली. या सर्व खेळाडूंनी गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरता आपले नाव निश्चित केले असून त्यांना प्रशिक्षक सुनिल मोरे व अतिक साटोटे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाजसेवक रमेश मोर यांनी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन करत गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content