रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरीचा पदग्रहण सोहळा संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरीचा पद्ग्रहण सोहळा संपन्न झाला.

 

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरीचा पद्ग्रहण सोहळ्याप्रसंगी व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला या देशाची सेवा या माध्यमातून सुवर्ण संधी लाभलेली आहे. सामाजिक कार्यक्रमांमधून व्यक्तिगत प्रगती होतेच तसेच समाजाला सुद्धा त्याचा खूप फायदा होतो आणि शिकायला सुद्धा मिळते. या माध्यमातून तुमच्या मधील गुणांचा विकास करा. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी सांगितले की, तुमच्या सर्जनशील मनाला जागरूक करा. आपला देश हा तरुणांचा देश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्या.  रोट्रॅक्ट मेंबर म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करा. रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरीच्या गतवर्षीची सेक्रेटरी खूषभू कांतरिया हिने तिचे अनुभव सांगितले व नवीन मेंबरचे अभिनंदन केले. यावेळी नवीन प्रेसिडेंट चेतन शिंदे याने वर्षभरामध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी तर्फे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. तर सेक्रेटरी वर्षा झोपे यांनी आभार मानले. रोटरॅक्ट कार्यक्रम समन्वयक प्रा. प्राजक्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.  यावेळी गोदावरी फाउंडेशन संचालित सर्व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी रोट्रॅक्ट क्लब ऑफ गोदावरीच्या मेम्बरशीपसाठी उपस्थित होते.

Protected Content