रोटरी क्लबतर्फे पोलिसांसाठी रक्त तपासणी शिबीर

पाचोरा, प्रतिनिधी  ।   रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगाव यांच्यातर्फे व कौशल्या क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने   “पोलिस बांधवांसाठी एक दिवस” या उपक्रमांतर्गत मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव यांचेतर्फे प्रोजेक्ट डायरेक्टर रो. डॉ. गोरख महाजन यांच्या सहकार्याने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये हा रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.  याप्रसंगी  रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. बाळकृष्ण पाटील, सचिव डॉ. प्रा. पंकज शिंदे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, उपप्रांतपाल रो. राजेश बाबूजी मोर, रो. निलेश कोटेचा, रो.शिवाजी शिंदे, डॉ. मुकेश तेली, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. अमोल जाधव, प्रोजेक्ट चेअरमन रो.डॉ. गोरख एस. महाजन, कौशल्या क्लिनिकल लॅबोरेटरी चे सहाय्यक मनोज वाघ, डॉ. घनश्याम चौधरी आदी उपस्थित होते.

पोलिस बांधवांची समाजासाठी असलेली बांधिलकी, अहोरात्र सेवा कार्य, धावपळ आणि ताण तणाव लक्षात घेता त्यांना कळत नकळत अनेक व्याधी लागण्याची शक्यता असते, याबाबत पोलिसांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांनी केले.

यानिमित्ताने पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, रोटरी उपप्रांतापाल रो. राजेश मोर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील व प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. गोरख महाजन यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, उपनिरीक्षक गणेश चौबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे उपस्थित होते. या रक्त तपासणी शिबिरात विविध आजारांशी संबंधित सुमारे दोन हजार रुपयांच्या रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबिराच्या यशस्वितेसाठी पोलीस कर्मचारी राहुल बेहरे, किशोर पाटील , प्रकाश पाटील, सुनिल पाटील, नितीन सूर्यवंशी, यशवंत घोडसे, समाधान बोरसे, देवेंद्र दातीर, भगवान बडगुजर आदींनी कामकाज पहिले.  सुमारे ५५ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला. रक्त चाचण्यांचे अहवाल सादर केल्यानंतर पुढील उपचारासाठी कौसल्या पॅथॉलॉजिकल लॅबच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल अशी माहिती प्रोजेक्ट डायरेक्टर गोरख महाजन यांनी यावेळी दिली.

 

Protected Content