यावल ( प्रतिनिधी ) येथील असंख्यमहीलानी आपली आर्थिक फसवणुक झाल्याने आज यावल पोलीस स्टेशनला येवुन फसवणुक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्याकडे आपली व्यथा मांडली मात्र या संदर्भात जळगाव पोलीसात या संस्थेच्या विरूद्ध आदीच तक्रार दाखल असुन दुसरी तक्रार घेता येणार नसल्याचे सांगीतले.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगावच्या प्रज्ञा संजिवन फाउंडेशन या संस्थेने गेल्या एक वर्षापासून येथील यावल शहरातील मुख्य रस्त्यावर महीला गृह उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र उघडले असून संस्थेने शहरातील व तालुक्यातील महीलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली प्रत्येक महीलेकडून ४०० रुपये प्रमाणे तालुक्यातील हजारो महीला सभासदकडून वर्गणी जमा केली, मात्र सुमारे एक वर्षात महीलांना कोणताही रोजगार न देता त्यांना संस्थेकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात होती. शनिवारी यावलच्या कार्यालयात काम करणाऱ्या जळगावच्या दोन महीला कार्यालय खाली करत असल्याचे व सर्व साहीत्य घेवून जात असल्याचे शहरातील महीलांना समजताच महीलांनी त्या संस्थेच्या कार्यालयावर एकच गर्दी केली. सदरचा प्रकार पोलींसाना समजताच तातडीने पोलीस निरिक्षक अरुण धनवडे व पोलीस या ठीकाणी दाखल होत त्या दोन महीलांना पोलीस ठाण्यात आणले पो. नि.अरूण धनवडे यांनी शहरातील महीलांची तक्रार एैकत त्यांना सदर संस्थेविरूध्द यावलच्या महीलेच्या फिर्यादिवरून जळगावला गुन्हा दाखल असल्याचे सांगत तेथे आपलेकडें असलेलेल पुरावे सादर करण्याचे सांगीतले व त्यानंतर पोलीस स्टेशनच्या आवारात जमलेल्या महीलांचा जमाव घरोघरी परतला. .