रेल्वे स्थानकाजवळ अनोळखी वृध्दाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वे स्थानकाजवळील पार्सल विभागाजवळ सोमवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एका अनोळखी वयोवृध्दाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

जळगाव रेल्वे स्थानकाजवळील पार्सल विभागाच्या नजीक असलेल्या पुलाजवळ बेशुध्दावस्थेत एका अनोळखी अंदाजे ६० वर्षीय वयोवृध्द आढळूल आला. यासंदर्भात जळगाव रेल्वे पोलीसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिनकुमार भावसार यांनी घटनास्थळी धाव घेतली. खासगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. दरम्यान, जळगाव रेल्वे पोलीसांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिनकुमार भावसार करीत आहे.

Protected Content