रेल्वे प्रवासात परप्रांतीय वृध्दाचा अकस्मात मृत्यू; रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव प्रतिनिधी । उत्तरप्रदेशातून मुंबईत मुलाकडे जात असलेल्या ७४ वर्षीय परप्रांतीय वृध्दाचा रेल्वे प्रवासात अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. याप्रकरण जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

जळगाव रेल्वे पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, फतेह बहादूरसिंह श्रीनाथसिह (वय-७४)  रा. ग्राम जयाकोट, पो. नोहरा थाना जलालपूर जि. जॉनपूर उत्तरप्रदेश हे मुलगा संदीपकुमारसिंह व सुन यांच्यासोबत मुंबई येथे राहणारा मुलगा प्रभातसिंह यांच्याकडे गोदाम एक्सप्रेसने मुंबईकडे जात होते. दरम्यान गुरूवार २ डिसेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजता रेल्वेगाडीने भुसावळ रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर फतेह बहादूरसिंह यांच्या छातीत कळा आल्याने त्याचा अकस्मात मृत्यू झाला. सोबत असलेला मुलगा संदीपकुमारसिंह याने तातडीने चैन ओढून रेल्वेगाडी थांबविली. त्यानंतर त्यांना रेल्वेने जळगाव पर्यंत आणण्यात आले. जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे पोहेकॉ संजय तडवी आणि पोलीस नाईक सचिन गुप्ता यांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पुढील तपास पोलीस नाईक सचिन गुप्ता करीत आहे.

Protected Content