जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्टेशनच्या पार्कींगच्या बाहेर रस्त्यावरून एका महावितरण कंपनीच्या वायरमनची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
किशोर विठ्ठल पवार (वय-२९) रा. खोटे नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. महावितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरीला आहे. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता किशोर पवार हे आपल्या दुचाकी (एमएच १९ डीए २५०१) ने जळगाव रेल्वे स्थानक येथे खासगी कामानिमित्त आलेले होते. त्यावेळी त्यांची दुचाकी रेल्वेस्टेशनच्या पार्किंगच्या बाहेर दुचाकी पार्क करून लावलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून न आल्याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १ मे रेाजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.