भुसावळ, प्रतिनिधी | रेल्वे प्रशासनाने शहरातील रेल्वेच्या हद्द्तील स्टेशनरोड येथील रस्त्याचे डांबरीकरण व डागडूजी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगरसेवक निर्मल रमेशचंद्र कोठारी यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक निवेद्नाद्व्रे यांना दिला आहे.
निवेदनाचा आशय असा की, रेल्वेच्या स्थापनेपासून भुसावळ शहरातील स्टेशनरोड हा रेल्वे विभागाच्या हद्दीत येतो. यापूर्वीपासून या रस्त्याचे डांबरीकरण, डागडूजी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने केली जाते. मात्र आपल्या विभागाकडून सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी रेल्वे विभागाकडे निधी नसल्याचे सांगितले जात आहे. या रस्त्याच्या प्रश्नी आपल्या विभागाकडून भुसावळ नगरपरिषदचे मुख्याधिकारी, यांना दि. १३ सप्टेंबर रोजी पत्र क्रमांक BSL/W/132/Misc/ADENHQ नुसार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या पत्रात आपल्या विभागाकडून संबधीत स्टेशनरोडच्या डांबरीकरण कामासाठी ४२ लाख ७६ हजार २०० रुपये निधीची आवश्यकता असून या कामासाठी ५० टक्के निधी २१ लाख ३८ हजार १०० रुपये पालिका प्रशासनाने द्यावे, असे नमुद करण्यात आले आहे. उपरोक्त विषयानुसार मी आपणास अवगत करुन देतो की, रेल्वे विभागातून दररोज निघणारा किमान १५ टन कचरा पालिकेच्या खेडी शिवारात असलेल्या डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. रेल्वे प्रशासनाकडे कचरा डपींग करण्याची किंवा त्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. डपींग ग्राऊंडवर दररोज टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यापैकी तब्बल ३० टक्के कचरा रेल्वे प्रशासनाचा आहे. पालिकेने नुकतेच या डपींग ग्राऊंडवर बायोमायनींग करण्यासाठी ३.५ कोटी रुपये निधी खर्च केला आहे. रेल्वेच्या कचऱ्यावर पालिकेने हा खर्च का करावा? यामुळे रेल्वे प्रशासनाने या झालेल्या खर्चापोटी ३० टक्के रक्कम अर्थात १ कोटी ५ लाख रुपये पालिकेला द्यावे. जे भुसावळकर नागरिक स्टेशनरोडवरुन वापरतात, म्हणून रेल्वे प्रशासन या रस्त्यासाठी निधी खर्च करायला तयार नाही. त्याच भुसावळकर नागरिकांकडून मिळणाऱ्या कराच्या रक्कमेतून डपींग ग्राऊंडवरील कचऱ्याचे बायोमायनींग झाले आहे. याचा थेट खर्चाची झळ भुसावळकर करदात्यांना बसली आहे. यामुळे रेल्वे विभागाने रेल्वेच्या निधीतून स्टेशनरोडचे डांबरीकरण करावे, अन्यथा सबंधीत कचरा बायोमायनींगसाठी ३० टक्के झालेला खर्च पालिकेला द्यावा. अन्यथा दिवाळीनंतर रेल्वे प्रशासनाकडून खेडी डंपीग ग्राऊंडवर कचरा टाकू दिला जाणार नाही. यासाठी भुसावळकरांना सोबत घेवून तिव्र जनआंदोलन छेडले जाईल
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/556898172070914