रेल्वेतील खाजगीकरणाला एनएफआयआर व सीआरएमएसचा विरोध

पाचोरा, प्रतिनिधी ।  भारत सरकार रेल्वेचे खासगीकरण करत असून या धोरणास एनएफआयआर व सीआरएमएसचा विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात सीआरएमएस जळगाव – पाचोरा शाखेतर्फे जळगाव व पाचोरामध्ये गेट बैठक घेण्यात आली आहे.

 

भारत सरकारच्या  रेल्वेचे खाजगीकरण धोरणास विरोध करण्याचे  एन.एफ.आय.आर. व सी. आर. एम. एस. यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सीआरएमएस जळगाव – पाचोरा शाखेतर्फे जळगाव व पाचोरामध्ये गेट बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत  रेल्वेच्या खाजगीकरणाला विरोध दर्शविण्यात आला. यावेळी आर. एम. एस. चे सचिव गणेश कुमार सिंग म्हणाले की,  रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली रेल्वेचे खाजगीकरण सुरू आहे.  रेल्वेचे खाजगीकरण होवू नये यासाठी सर्वांनी मिळून त्याला विरोध दर्शविला पाहिजे. रेल्वेत सुरू असलेले आऊटसोर्सिंग बंद झाले पाहिजे, रेल्वेतील रिक्त पदे त्वरित भरावी या सह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जळगाव येथील गेट मिटिंगमध्ये जळगाव स्थानकाचे स्टेशन मास्तर श्री. अग्रवाल, श्री. ठाकूर, शाखा पदाधिकारी रिटे श्रीवास्तव, विनय सिंह, बी. एम. पाटील, पियुष महेश्वरी, हेमराज मीना, गणेश पाटील, अविनाश कुमार, वाल्मिक बोरसे, योगेश चव्हाण, गजानन पाटील, चंद्रकांत सपकाळे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content