रेडक्रॉसतर्फे रोगप्रतिकारक शक्ति वाढवणार्‍या होमिओपॅथी औषधांचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी । आयुष विभागाने रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यास सहाय्य करणारे आर्सेनिक अल्बम ३० हे औषध उपयुक्त ठरेल असे सांगितले आहे. जळगाव रेडक्रॉस सोसायटीने पुढाकार घेऊन आतापर्यंत होमिओपॅथी ३००० औषधांची बाटल्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले आहे.

१८ व्या शतकापासून वेगवेगळ्या महामारी व आजारांमध्ये होमिओपॅथिक औषधे उपयुक्त ठरली असे आढळून आले. लहान मुलं ते वयोवृद्ध ही हे औषध घेऊ शकतात. हे औषध जळगावातील डॉक्टर्स, नर्सेस, जीवनावश्यक सेवा देणारे, अन्नधान्य पुरवणारे कर्मचारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी, वाहतूक नियंत्रण शाखेतील, नवजीवन मधील कर्मचारी, भाजी व फळ विक्रेते तसेच पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी, सफाई कर्मचारी, रेडक्रॉस मधील स्वयंसेवी तसेच बँकेतील कर्मचारी इत्यादी लोकांना आतापर्यंत रेडक्रॉसतर्फे विनामूल्य देण्यात आले आहे. डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांच्या पुढाकाराने ह्या उपक्रमासाठी व होमिओपॅथिक तज्ञ डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. नरेंद्र सोनार, डॉ. अमीन पटेल, डॉ. पराग भागवत, डॉ. जितेंद्र जैन, डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, डॉ. अमित पवार इत्यादींचे मौल्यवान सहकार्य मिळत आहे. रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेनन, रेडक्रॉस ब्लड बँकेचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, मा. सचिव विनोद बियाणी व संचालक राजेश यावलकर, अनिल कांकरिया तसेच घनशाम महाजन यांचे विशेष सहकार्य मिळत आहे.

Protected Content