Home Cities चोपडा रूद्र अपंग संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अर्चना पाटील

रूद्र अपंग संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी अर्चना पाटील

0
31

 

चोपडा, प्रतिनिधी । येथील अर्चना पाटील यांची रूद्र अपंग संघटना, वाशिम महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या ‘ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डाॅ. सुरेश पाटील काॅलेज ऑफ नर्सिंग, चोपडा येथील अकाऊंटंट कम क्लॉर्क राजेंद्र परशुराम पाटील, बहादरपूरकर यांच्या अर्चना पाटील ह्या पत्नी आहेत. त्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष .संतोष व्यास, प्रदेश अध्यक्ष बाळाप्रसाद अग्रवाल, प्रभारी अध्यक्ष विष्णु सांगळे तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष रेणुका सोनवणे यांनी केली .या निवडीबद्दल अर्चना पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अर्चना पाटील यानी यापूर्वी ही या संघटनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे त्यांचे काम पाहून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पदोन्नती दिली आहे.


Protected Content

Play sound