जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रिपाइं आठवले गटाची पद्मालय विश्रामगृहात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आज शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सदस्य नोंदणी, जिल्हा कार्यकारणी निवड तसेच ३ ऑक्टोबर रोजी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात तालुकास्तरावर सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी रमेश मकासरे यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी पक्षाला आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीकडून योग्य त्या जागा मिळाव्यात अशी आग्रही भूमिका मांडली. बैठकीत महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, युवक जिल्हाध्यक्ष रवि सपकाळे, युवक जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे, ईश्वर इंगळे, विकी तायडे, संजू तायडे, संदानंद वाघ, युवराज तायडे, कमलाकर गाढे, भीमराव तायडे, राजू तडवी, विष्णू पारधे, अशोक कापडणे, शांताराम तायडे, प्रवीण इंगळे, शिवराज रायसिंग, अण्णा खेडकर, रत्नाकर जोहरे, प्रताप बनसोडे आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यात पक्षाला आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीकडून योग्य त्या जागा मिळाव्यात अशी आग्रही भूमिका पदाधिकार्यांनी मांडली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/601652591359582