यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील रिधोरी ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे गावातील रोजगार हमी योजने अतंर्गत मागील अनेक वर्षापासून महिलांना कोणताच लाभ मिळाला नसल्याची तक्रार गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे.
गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांना दिलेल्या निवेदनाच अशा की, रिधोरी तालुका यावल या ग्रामपंचायती अंतर्गत मागील सन्२००७पासुन ग्रामपंचायत पातळीवर रोजगार चालु असुन मात्र या योजनेचा अद्याप लाभ मिळालेला नाही. त्यांचा पगार ग्रामसेवकाच्या खात्यात जमा होत आहे. ग्रामसेवक व सरपंच रहीवासी असल्याचा दाखला देण्यास नकार देतात. दाखला मागायला गेल्यानंतर ग्रामस्थांशी उद्धटपणे बोलतात. या दाखल्या अभावी घरकुल योजना, निराधार विधवा योजना पेन्शन , जॉब कार्ड अशा शासनाच्या योजनापासुन वंचीत राहावे लागत आहे. गावातील महिलांना शौचालय नसल्याने रात्रीच्या वेळेत बाहेर शौचास जावे लागते. या सर्व प्रकारामुळे गावातील महीलावर्गाला मोठया अडचणी व त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामसेवक व सरपंच वारंवार तक्रारी करून देखील महीलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार करून पंचायत समिती प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष वेधावे या करीता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन रिधोरीच्या महीलांनी गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांची भेट घेवुन केली आहे. या निवेदनावर मिना विठ्ठल सोनवणे , ज्योतीकाशिनाथ सोनवणे , वत्सला आत्माराम सोनवणे , कल्पना श्रीधर सोनवणे, शोभा राजु तायडे , अंजु चंद्रभान सोनवणे , शोभा राजेन्द्र सोनवणे , सिंधुताई रविन्द्र गवळी , प्रमिला विनायक सोनवणे , कांचन विशाल सोनवणे यांच्यासह आदी महीलांच्या स्वाक्षरी आहे .