Home Cities जळगाव रिक्षा चालकांवर उपासमारीचे संकट : शासन मदतीसाठी आ. महाजनांकडे साकडे

रिक्षा चालकांवर उपासमारीचे संकट : शासन मदतीसाठी आ. महाजनांकडे साकडे

0
19

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना संसर्गाने थैमान घातल्याने जन जीवन विस्कळीत झाले त्याचा जबर फटका रिक्षा चालकांना मोठ्याप्रमाणावर बसला आहे. त्यांच्याकुटुंबीयांवर उपासमारीची भीषण संकट कोसळले आहे. या अनुषंगाने जिल्हा रिक्षा मालक-चालक संघटनेने किराणा कीटसह आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राज्य व केंद्र सरकारकडे आ. गिरीश महाजन यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन जिल्हाधिकारी यांचेमार्फत शासनस्तरावर पोहचवून मदतीचे आश्वासन आमदारांकडून देण्यात आले.

कोरोना संसर्ग आजाराचा कहर वाढत चालला असून गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाउनचे तंतोतंत पालन करून रिक्षा युनियनने घरातच बसणे पसंत केल्यामुळे कुटुंबावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन शासनाने रिक्षा चालकांना दहा हजार रुपये व किराणा कीट तातडीने द्यावे अशी मागणी जळगाव जिल्हा नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनने केली आहे. निवेदन आ. गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले. याप्रसंगी खा. उन्मेष पाटील, आ. चंदू पटेल, आ. संजय सावकारे, आ. राजुमामा भोळे, जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ जावळे, आ. स्मिता वाघ, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, उपाध्यक्ष प्रमोद वाणी, अस्लम शेख, नईम खाटीक, प्रभाकर तायडे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.


Protected Content

Play sound