जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौकात प्रवासी रिक्षाने धडक दिल्याने पायी जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिवार १३ मे रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किशनचंद राजलदास बजाज (वय-६५) रा. सिंधी कॉलनी, गुरुनानक नगर, भुसावळ हे वयोवृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. कामाच्या निमित्ताने ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ते जळगाव शहरात अजिंठा चौफुली येथे आले होते. अजिंठा चौफुलीकडून चंदू स्वामील समोरील रोडवरून पायी जात असताना पाठीमागून येणारी अज्ञात प्रवासी रिक्षाने किशनचंद यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा जगदीश किशनचंद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी १३ मे रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.