जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील उस्मानिया पार्क येथील गोडावूनजवळ रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकाला तीन जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी रात्री उशीरा जळगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख वसीम शेख अजीमुद्दीन (वय-२५) रा.मन्यारवाडा, जुने जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल येथे विद्यार्थी घेऊन येणे व त्यांना सोडण्याचे काम करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ व्ही ८३२१) क्रमांकाची रिक्षा आहे. नेहमीप्रमाणे गुरुवार २३ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता शेख वसीम शेख अजीमुद्दीन हे अँग्लो उर्दू हायस्कूलचे तीन विद्यार्थ्यांना घेऊन उस्मानिया पार्क येथील गोडवून जवळून जात असतांना अदिल पटेल रा. उस्मानिया पार्क, जळगाव हा (एमएच १९ सीडब्ल्यू ३२५१) हा रिक्षा घेऊन तिथे आला. त्यावेळी त्याच्या रिक्षाने शेख वसीम शेख अजीमुद्दीन यांच्या रिक्षातील विद्यार्थ्यांच्या दप्तरला धक्का लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर थोड्याच वेळात अदिल पटेल याने रिक्षाला ओव्हर टेक केले. त्यानंतर अदिल पटेलसह त्याची आई व भाऊ यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. व हातातील लोखंडी वस्तू मारून दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर रिक्षा चालक शेख वसीम शेख अजीमुद्दीन यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अदिल पटेल रा. उस्मानिया पार्क यासह त्याचे भाऊ आणि आई यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास त्याला ओव्हरटेक करत पोलीस नाईक ललित भदाणे करीत आहे.