राहूल गांधींना देशाबाहेर हाकला : महिला खासदाराची मागणी

भोपाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राहूल गांधी यांना देशाबाहेर हाकला अशी मागणी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

 

कॉंग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी विदेशात केलेल्या वक्तव्यावरून खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, तुम्ही भारताचे नाहीत हे आम्ही मान्य केलं आहे. कारण तुमची आई इटलीची आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेला मुलगा कधीच देशभक्त होऊ शकत नाही. हे आम्ही सांगत नाही. तर चाणक्यानेच तसं लिहून ठेवलं आहे. चाणक्यांनी जे म्हटलंय तसंच राहुल गांधी वागत आहेत. इतके वर्ष तुमचं देशात सरकार होतं. तुम्ही देशाला पार पोखरून टाकलं होत. आम्ही त्यांचा निषेध करत असून राहूल गांधी यांना देशाबाहेर पाठविण्यात यावे अशी मागणी देखील साध्वी प्रज्ञासिंह यांनी केली.

 

त्या पुढे म्हणाल्या की, संसदेत चांगलं काम सुरू आहे. सर्व काही चांगलं होत आहे. मात्र कॉंग्रेसचे लोक संसद चालू देत नाहीये. त्यांचं अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आलं आहे, त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे. राहुल गांधी देशाचे नेते आहेत. तुम्हाला लोकांना निवडून दिलं आहे. तरीही तुम्ही परदेशात जाऊन देश आणि देशातील जनतेचा अपमान करत आहात अशी टीका त्यांनी केली.

Protected Content