राहुल गांधी हेच कॉंग्रेसला नवसंजीवनी देतील ; सर्वेक्षणाचा कौल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी कोणता नेता योग्य आहे, असे तुम्हाला वाटते?, या प्रश्नावर राहुल गांधी हेच कॉंग्रेसला नवसंजीवनी देतील, असा कौल एका सर्वेक्षणातून बहुतांश भारतीयांनी दिला आहे.

 

देशातील राजकीय, आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षा, करोना परिस्थितीसंदर्भात ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने सर्वेक्षण केले . ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ या नावाने करण्यात आलेल्या पाहणीत काँग्रेसच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी कोणता नेता योग्य आहे, असे तुम्हाला वाटते?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना २३ टक्के नागरिकांनी वाटते की, राहुल गांधी काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतात. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर १४ टक्के लोकांना वाटत प्रियंका गांधी या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी योग्य नेत्या आहेत. १४ लोकांना वाटत सोनिया गांधी काँग्रेस पुन्हा चांगले दिवस आणू शकतात. तसेच १८ टक्के भारतीयांना वाटते की, मनमोहन सिंग यांचे नेतृत्त्व काँग्रेसला उभारी देऊ शकते. तर १४ टक्के लोकांनी माहिती नाही, असे उत्तर दिले.

Protected Content