यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | थोर स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात तथ्यहीन वक्तव्ये करणारे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येवुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांंच्या स्वातंत्रविर सावरकरांच्या विरोधात यावल तालुका भाजपायुवा मोर्चा यावल येथे शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी यावल चोपडा रस्त्यावरील भुसावळ टी पाँईटवर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने गांधी यांच्या निषेर्धात घोषणा देण्यात आल्यात. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय भालेराव, तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, जिल्हा सदस्य भूषण नेहेते, भाजपा युवा मोर्चाचे यावल शहर सरचिटणीस परेश नाईक, भूषण फेगडे, तुषार चौधरी, गोपाळ कोळी, कोमल इंगळे, तिर्थराज भिरुड यानी या आंदोलनात सहभाग घेतला.