राहुल गांधींनी मी ओळखत नाही; असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली प्रतिनिधी | आपण राहूल गांधी यांनी ओळख त नसल्याचे सांगत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

 

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर  एका कार्यक्रमात बोलताना एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी  यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच राहुल गांधींना  ओळखत नसल्याचे सांगत निशाणा साधला.   एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी यांनी राहुल गांधींना ओळखत नसल्याचे सांगत कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.

ओवेसी म्हणाले की, गेली काही वर्षे कॉंग्रेससोबत राहिल्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की, आगामी दोन ते तीन वर्षांत कॉंग्रेस फुटेल, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला. तसेच कोण आहेत राहुल गांधी? मी ओळखत नाही. तो कोण आहे हे तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा, असा खोचक टोलाही लगावला. आम्हाला प्रत्येक पक्षाची बी-टीम म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही राहुल गांधींना इथे बोलावले, तर ते भाजपासारखीच भाषा बोलतील आणि तशीच भाषा अखिलेश यादवही बोलतील, असे ओवेसी म्हणाले.

Protected Content