जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावात पाणी तसेच वीज मिळावी या मागणीसाठी मनसेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. घोषणाबाजी करत लोकांचा रस्ता अडवून ठेवला, तसेच जनतेला वेठीस धरले, या कारणावरुन पोलिसांनी आंदोलनात सहभागी १८ जणांविरोधात सोमवार, १९ जून रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक भरत चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, याच तक्रारीवरुन रस्त्यात बसून घोषणाबाजी करणे, लोकांचा रस्ता अडवून प्रशासनाला व जनतेला वेठीस धरले या कारणावरुन मुकूंदा आनंदा रोटे, विनोद शंकर शिंदे, राजेंद्र सुकलाल निकम, आशिष उत्तमराव सपकाहे, चेतन दिलीप अढळकर, ललीत गौरीशंकर शर्मा , हेमंत कोळी, विकास पाथरे, शैलेश चौधरी, गणेश कोळी, मनोज घुगे, भाईमदास बागले, आनंदा बागले, अविनाश जोशी, संजय मोती, सागर शिंपी, महेश कोळी व राजेश कोळी या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहेत.