पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव-पाचोरा-जळगांव या राष्ट्रीय महामार्गावरील वेगवेगळ्या टप्प्यांवर रखडलेल्या रस्त्यांचे काम त्वरित सुरू करण्यासाठी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून कजगाव, नगरदेवळा, भडगाव, पाचोरा, नांद्रा या पाच ठिकाणी एकाच वेळी साखळी पद्धतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी आज ७ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, मा. नगरसेवक तथा पी. टी. सी. चे चेअरमन संजय वाघ, पाचोरा तालुका अध्यक्ष विकास पाटील, रा. काॅं. विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, शहर अध्यक्ष अजहर खान, रणजीत पाटील, पी. डी. भोसले, शशि चंदिले, भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील, युवक तालुका अध्यक्ष कुणाल पाटील (भडगाव), हर्षल पाटील, व्ही. एस. पाटील, भुषण सोनवणे, अरुण सोनवणे, राहुल पाटील, जगदिश पाटील, प्रदिप पाटील यांचेसह पाचोरा व भडगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
२१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० पाचोरा येथे मा. आ. दिलीप वाघ, तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान, युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, महिला तालुका अध्यक्षा रेखा देवरे, महिला शहर अध्यक्षा जयश्री मिस्तरी, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्षा किर्ती अहिरे, रज्जु बागवान, हरिश पाटील, अरुण पाटील, नांद्रा येथे विधान सभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, पंचायत समितीचे गटनेते ललित वाघ, शेतकी संघाचे चेअरमन सुनिल पाटील, विनोद तावडे, योगेश सुर्यवंशी, भडगाव येथे संजय वाघ, शाम भोसले, युवक तालुका अध्यक्ष कुणाल पाटील, व्ही. एस. पाटील, रेखा पाटील, योजना पाटील, अरुण सोनवणे, विवेक पवार, रफ्फुद्दिन शेख, शेरु पठाण, नगरदेवळा येथे अभिजित पवार, पिंटु भामरे, रज्जाक शेख, अशोक सोनी, अभिलाषा रोकडे, निकीता परदेशी व कजगाव येथे भडगाव तालुकाध्यक्ष राहुल पाटील, तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक प्रवक्ते भुषण पाटील, कजगाव शहर अध्यक्ष अशोक पाटील, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष आरिफ मलिक, राहुल पाटील (तांदुळवाडी), अशोक सोनवणे (कजगाव), गोविंद महाजन (भोरटेक) यांच्या प्रमुख उपस्थितीत साखळी पद्धतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. या रस्ता रोको आंदोलनात त्या – त्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.