राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त अर्चित पाटील यांचे आ. भोळे यांनी केले अभिनंदन

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील रहिवाशी वंश हॉस्पिटल व सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ. राहुल पाटील, डॉ. अंजली पाटील यांचे चिरंजीव तसेच काशिनाथ पलोड शाळेचा विद्यार्थी अर्चित पाटील यांना केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला. आज आमदार राजू मामा यांनी त्याचे राहत्या घरी जाऊन बाल संशोधक अर्चित पाटील यांचा सत्कार केला.

बाल संशोधक अर्चित पाटील यांच्या सत्कार प्रसंगी भाजप महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी , सामजिक कार्यकर्ते उदय पवार, नरेंद्र जैन, डॉ. राहुल पाटील, डॉ. अर्चना पाटील, अर्चित पाटील यांच्या आजी सुलोचना पाटील, दिनेश ठाकरे, डॉ. धर्मेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी अर्चीत पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत पुरस्कारासाठी प्रेरणा देणारे आई, वडील,शिक्षक ,आजी सुलोचना पाटील, पुरस्कार विजेता अर्चित पाटील यांचेशी संवाद साधला. जिल्हावासियांना आपला अभिमान असून अनेक बाल संशोधकांना आपल्याकडून प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त केली असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

Protected Content